मराठा आरक्षण का रद्द झाले? निकालपत्राचे बहुआयामी अन्वय (उत्तरार्ध)
मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालायाचा निकाल अजिबात आश्चर्यकारक नाही. प्रश्न आहे, आपण तो मानायला तयार आहोत की नाही? सामाजिकदृष्ट्या सर्व अर्थाने पुढारलेल्या समाजघटकाला आग्रहाने मागास ठरवून, तो मागास कसा ठरतो? वस्तुत: संविधानाचे प्राथमिक ज्ञान असणारी व्यक्तीसुद्धा या निकालाचे याच पद्धतीने विश्लेषण करू शकते. पण आजूबाजूला आक्रमकपणे, आग्रहाने मांडले\बोलले जात असताना तसे बोलण्याची इच्छा आपण दाबून टाकतो.......